माझी मराठी विश्वजननी
केली तिजला लुळी – पांगळी
आम्ही स्वकियांनी….
परभाषेची घुसखोरी,
सदा अपुल्या ओठांवरी,
हाय फाय शब्दांना भुलतो
माय मराठीस अपमानीतो
असूनी मराठी,
नांदी बोलण्याची,
परभाषेत करतो…..
मराठी भाषेचे गोडवे,
मराठी भाषा दिनीच गातो…..
अन्य दिनी, पॉप, झाज, सालसा यातच रमतो….
मराठी भाषा मरते आहे,
आपणच ओरडतो,
अनन्वित अत्याचार करूनी तिज अनादरितो …
मराठी जगली पाहिजे असे फतवे काढतो,
किती आत्मीयता मराठीची आपण जपतो?
एवढेच सांगणे विश्वाला,
माझी मराठी विश्वजननी….
गावंढळ म्हणा खुशाल तिला
आहे ती खरी साऱ्या भाषांची राणी…..