हे भरजरी वस्त्र आयुष्याचे,
वरदान मिळे जणू ईशाचे!
ह्या शालू सम वसना वरचे,
बुट्टे जरतारी निमिषां चे !
मृदू , रेशमी क्षणाक्षणांची,
काढली नक्षी रंग बिरंगी!
उभ्या-आडव्या जरतारी नी,
ती खुलून जडली मन रंगी !
चंदेरी जरीच्या स्मृती तारा,
चमकती किती काठा वरती!
संचित ,कोमल ,सान क्षणांचे,
नर्तन करिती मोर किती !
हा वार्धक्याचा रंग पांढरा,
मिसळला असे शालूत जरी!
जीर्ण शीर्ण हा शालू आगळा,
अधिक प्रौढ अन् मनहारी!
खूप सुंदर 👌