असो उणे 30°ची थंडी….!
वा असो ५०℃ ची गर्मी…..!
क्षणभराचीही नसे विश्रांती
ऋतुकाळाची मला नसे क्षिती
तमा कुठलीच मी बाळगत नाही
टापूतल्या शत्रूला टिपल्याशिवाय मी रहात नाही
माझ्या पवित्र मायभूमीला कधी मी नराधमांचा स्पर्शही करू देत नाही
आईवडील, भाऊबहीण, पत्नी-मुलं सगळीच नाती तुमच्या सारखी
सीमेचे रक्षण करता मनात मात्र भारतमाताच सारखी
उरी असूदे वा असो कारगिल
आम्ही नसतो कधीच गाफील
शत्रूची कागाळी आम्ही सहन करत नाही
जीवासंसाराची ची पर्वा आम्ही करत नाही
भारतमातेची सीमा राखतो आम्ही
भारतमातेची सीमा राखतो आम्ही
प्रजासत्ताकाची हीच महती
देशाची वाढवू यशोगाथा कीर्ती