टाळ्यांच्या कडकडाटात त्या सत्कारमूर्तींचे कार्यक्रम स्थळी आगमन झालं.
आयुष्यात इथवर पोचण्यासाठी त्याने जे काही केले होते ते झर्रकन त्याच्या डोळ्यांसमोरून सरकले.
स्टेजकडे जात असताना अचानक त्याची नजर श्रोत्यांत बसलेल्या त्याच्यावर पडली आणि तो चपापला.
आपल्याच नजरेतली अपराधीपणाची भावना त्याला तीव्रतेने जाणवली.
ओशाळलेली नजर घेऊन एके काळच्या आपल्याच सहकाऱ्याला ‘पायरी’ बनवून आपले ध्येय गाठलेला तो आज स्टेजच्या पायऱ्या चढत होता…