सध्या परीक्षेचे दिवस आहेत, मुलांची सतत लगबग सुरू आहे, अभ्यास, वह्या पूर्ण करणे, प्रोजेक्ट सादरीकर, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा ची तयारी, हे न ते, काही तरी गडबड सुरू च आहे. १०वी, १२वी च्या परीक्षा एकतर संपल्या आहेत किंवा संपत आल्या आहेत. या वर्षी पूर्ण सत्र ऑफ लाइन झाल्यामुळे मुलं खुश आहेत, कारण मागचे २ वर्ष तर करोनामुळे विध्यार्थीवर्ग खूपच नाराज झाले होते. शाळा नाही, कॉलेज नाही, ट्यूशन नाही, नीट अभ्यास होत नव्हता, मित्र- मैत्रिणींना भेटता येत नव्हतं. त्यांना बिचाऱ्यांना समजतच नव्हतं काय करायला हवं. किती अभ्यास करायचा, कसा करायचा, तांत्रिक बाजू सांभाळायची, की शिक्षक काय म्हणतंय त्याच्या कडे लक्ष द्याच. सगळीकडे नुसता गोंधळ होता. पण आत तसं नाही, ही मात्र विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. निदान ज्यांना अभ्यास करायला आवडतो, शाळेत जायला आवडतं, त्यांच्यासाठी तरी. आणि ज्यांना आवडतं नाही ते शाळेत मस्ती करायला मोकळे. असो…… विद्यार्थ्यांसाठी
पण या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ३ प्रकारचे लोक आहेत बरं का!!
एक जे खूप अभ्यास करतात, ज्यांना त्यांच्या आयुष्याचं ध्येय माहीत असतं आणि ते त्या दृष्टीने पुढे जातात. आणि त्यांना पुरेपूर यशही मिळत.
दुसरे ज्यांना अभ्यासात मुळीच आवड नसते, त्यांना भविष्याची किंवा त्यांच्या आयुष्याची काळजीही नसते. आणि ते तसे प्रयत्नही करत नाहीत, स्वतःला सुधारण्याकरीता. त्यांचे विचार असे का असतात, हे मात्र कोणी समजू शकलं नाही.
आणि तिसऱ्या पद्धतीचे जे खुप हुशार नसले तरी अभ्यास करतात, पूर्ण प्रयत्न करतात, पण नशीब काही त्यांना साथ देत नाही, परीक्षा देतांना कधी वेळेवर आठवत नाही, तर कधी वेळ पुरत नाही, काही न काही गडबड नक्कीच होते. कितीही अभ्यास केला तरी यश काही हाती लागत नाही. त्यांची इच्छा खुप असते काहीतरी करायची, पण जमतंच नाही आणि मुख्य म्हणजे याच मुलांना सगळ्यात जास्तं बोलणी ऐकावी लागतात. कारण जे खूप हुशार असतात त्यांना काही बोलायची गरज नाही, आणि ज्यांना अभ्यास करायचा नसतो त्यांना बोलून काही उपयोग नाही. मग उरले तिसऱ्या पध्दतीचे, त्यांच्या मागे पालक मंडळी सतत मागे लागलेली असते. अच्छा, आणि पालकांच्या भरपूर अपेक्षा ही असतात त्यांच्याकडून, पण जर नशिबाची साथ मिळत नसेल तर ते तरी काय करणार. कधी कधी तर त्यांना पुढच्या आयुष्यत सुद्धा त्रास होतो. हवी तशी नोकरी मिळत नाही, कुठलं ही काम केलं की, त्यात हवं तसं यश मिळत नाही. कितीही पुढे जायचा प्रयत्न केला तरी अपयशच हाती येतं. प्रत्येक कामात अडचणी येतात. सगळ्या गोष्टींना उशीर लागतो.
आणि आज मी जे गाणं निवडलं आहे ते अश्याच परिस्थितीला मिळत जुळत आहे.
चित्रपट – कभी हा कभी ना, १९९४ मध्ये रिलीस झालेला. चित्रपटात मुख्य भूमिकेत – शाहरुख खान, सुचित्रा कृष्णमूर्ती आणि दीपक तिजोरी. निर्देशक कुंदन शाह, निर्माता – विक्रम मेहरोत्रा. संगीतकार
जतीन- ललित. आणि हे गाण्याचे गायक कलाकार – देवकी पंडित आणि कुमार सानू. अप्रतिम गाणं.
वो तो है अलबेला,
हजारों में अकेला,
वो तो है अलबेला,
हजारों में अकेला,
सदा तुमने ऐब देखा,
हूनर को न देखा……..
खरंच काही काही लोकांच नशीब असंच असतं. सतत प्रयत्न करूनही, निराशाच हाती येते. आणि अशा परिस्थितीत जर घरच्या मंडळीची साथ मिळाली नाही तर तो किती हताश होतो. सतत घरच्यांचे टोमणे ऐकावे लागतात. बाहेरच्या जगाने साथ दिली नाही तरी एक वेळेस चालत. पण घरातल्यांचा विश्वास हवा. घरच्यांची साथ हवी. कधी आई सक्त असते, तर कधी वडील. खरंतर आई-वडिलांचं चिडण, रागावणं हे मुलांच्या भविष्यासाठीच असतं. त्यांच्या चांगल्यासाठीच असतं. पण या सगळ्यांमुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये मतभेद वाढतच जातात.
त्या मुलांचा तरी काय दोष, जर परिस्थिती, वेळ, नशीब साथ देत नसेलं. खरंतर सगळी मुलं सारखी कशी असू शकतात? प्रत्येकचं स्वतःच एक वेगळंच अस्तित्व किंवा आयुष्य घेऊन जन्माला येतं. या सगळ्या परिस्थितीत त्याला कसं वाटत असेल, तो किती हताश होत असेल. हे समजून घ्यायला हवं. घरच्यांना सतत त्यांच्यातले दोषच दिसतं असतील आणि त्यांच्यातले चांगले गुण कोणी बघतच नसेल तर, त्याला किती त्रास होत असेल. त्यांचे शेजारी, ओळखीची माणसं जरी त्याची साथ देत असतील, पण जर त्यांच्या घरचेच सोबत नसतील तर, त्यांना किती एकट वाटतं असेल. हा विचार करायला हवा.
फुरसत मिली ना तुम्हें,
अपने जहाँ से,
उसके भी दिल की कभी, समझते कहाँ से…..
जाना है जिसे पत्थर,
हीरा है वो तो हीरा…..
सदा तुमने ऐब देखा
हुनर को ना देखा…..
आई – वडील मुलांना नेहमीच दोष देतात, पण काही काही पालकांनी हा विचार करायला हवा की ते स्वतः किती प्रयत्न करतात, मुलांची बाजू समजून घ्याचा. काही काही पालक मंडळी नेहमी स्वतःच्याच आयुष्यात busy असतात, स्वतःच्या कामात, मुलांच भविष्य, स्वतःच आयुष्य आणि बाकी इतर कामात इतके गुंतले असतात की त्यांना मुलांकडे लक्ष द्याल वेळच नसतो.
कितीही मेहनत करून किंवा कितीही प्रयत्न करून, एखादं काम मुलांना जमत नसेल, तर यात मुलांचा दोष आहे का की परिस्थितीचा, हे जर पालकांनी समजूनच घेतलं नाही. आपलं मुलं प्रयत्न तर करतंय! या गोष्टी कडे ही त्यांचं लक्ष जात नाही. प्रत्येकदा मुलांना काहीतरी बरं वाईट बोलतात, पण त्यांच्याले सुप्त गुण पालकांना दिसत नाही.
तसं बघितलं तर प्रत्येकच मुलं हे वेळग असतं, प्रत्येकात काहीतरी वेळगी प्रतिभा असते आणि म्हणूनच ते स्वतःच एक Star आहे. ह्या गोष्टीचा पालकांनी विचार करायला हवा.
बंसी को लकड़ी सदा,
समझा किये तुम,
पर उसके नग्मों की धून, कहाँ सुन सके तुम….
दिए की माटी देखी,
देखि न उसकी ज्योति….
सदा तुमने ऐब देखा,
हुनर को न देखा….
या कडव्यात खूप छान उपमा दिली आहे. जसं बासुरी/ बासरी एक लाकडाचा तुकडा आहे. पण त्या एका लाकडाच्या तुकड्यातून जर एखादं छान वाद्य तयार करता येऊ शकत. तसंच मुलांना जर चांगल मार्गदर्शन मिळालं, त्यांच्याकडे पालकांनी जाती ने लक्ष देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं तर एखाद्याचं आयुष्य नक्कीच मार्गी लागू शकत. जर एका लाकडाच्या तुकड्यातून बसुरी बनून, सुंदर, मोहक आवाज येऊ शकतो, तर मग ही मुले सुद्धा खूप काही करून दाखवू शकतात. दिवा हा मातीचा बनला आहे, पण तो प्रकाश ही देऊ शकतो या दृष्टीने मुलांकडे ही बघायला हवं. एखाद्याला एक गोष्ट जमतं नाही म्हणून काहीच जमणार नाही, हा दृष्टिकोन बदलायला हवा.
खरंतर एखाद्या मुलात/व्यक्तीत, असलेले गुण आणि त्या व्यक्तीकडून केल्या गेलेल्या अपेक्षा, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण एखाद्या मुलाचा कलं चित्रकलेत, नृत्य, खेळ, पाककला, लेखन किंवा कुठल्याही क्षेत्रात असू शकतो आणि त्याचे आई-वडील त्याच्या कडून डॉक्टर किंवा इंजिनिअर च हो, अशा अपेक्षा करणं, चुकीचं नाही का? मुलांसाठी आजकाल खूप वेळवेगळ नवीन क्षेत्र आहेत. प्रत्येकाला स्वतःच्या आवडीचा विषय निवडता येऊ शकतो. त्या मुलाची किंवा त्या व्यक्तीची बुध्दीमत्ता, त्याची क्षमता, त्याची एखाद्या विषया बद्दलची आवड या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच शिक्षण किंवा कॅरियर निवडलं तर नक्कीच यश मिळेल. या व्यतिरिक्त पालक मंडळी कितपत वेळ देऊ शकतात किंवा मदत करू शकतात याचा ही विचार करायला हवा. दोन मुलांमध्ये तुलना करणे, टाळायला हवे. मुलांमध्ये एकमेकांविषयी स्पर्धेची भावना निर्माण करणं हे ही चुकीचं आहे, त्याने मुलांची मानसिकता चुकीची होत जाते. या उलट, शिक्षण हे आयुष्यात किती गरजेचं आहे, हे मुलांना समजावणं तितकंच गरजेचं आहे. विध्यार्थी आणि त्यांच्या आई- वडिलांनी एकमेकांच्या कलेने घेतलं तर बरेच गैरसमज आणि वाद टाळता येण्यासारखे आहेत. आणि मुलांना, यश हाती येईल की नाही हे जरी माहीत नसले तरी, आपले आई – वडील कायम आपल्या पाठीशी आहेत आणि आपल्याला समजून घेत आहेत, ही भावना कायम त्यांच्या मनात राहील.