माझे व्यक्त होणे म्हणजे लेखन….
माझे लेखन इतरांना आवडणे ही पुढची पायरी….
माझ्या लेखनाला दाद देणे कौतुकास्पद…..
माझे लेखन चतुरस्त्र होणे हे वाचकांवर अवलंबून असते…
लेखन यशस्वी कधी वाटते जेव्हा वाचक वृंद वाढत जातो….
स्वतःसाठी लिहिणे….
स्वतःचेच वाचणे…..
स्वतःचे कौतुक करणे….
स्वकेंद्रित लिखाण…. हे लिखाण होते का?
या सर्व मुद्द्यांवरून,
‘माझे हा शब्द काढून टाकला तर’… किती छान वाटतं ते!
कारण ते मग आपले होऊन जाते……
आणि मग त्यामध्ये आपलेपणा निर्माण होतो…..