दिवाळी पुन्हा येणार !
जुन्या आठवणी आणणार..
नव्या आठवणी जागवणार
दिवाळी परत येणार
दिन दिन दिवाळी गाईम्हशी ओवाळी म्हणायचो
आता त्या तरी आहेत कुठं आसपास…
तशा तेव्हाही सर्वांच्या आसपास नव्हत्याच
लहानपणी असायचा दिवाळीला गोतावळा
मजा खूप यायची
आता तर तो नाही.. एखादा भाऊ..एकुलती बहीण एकच मामा… एखादी आत्या…आपण ही एकटेच
तरीही जमतो भाऊबीजेला … सख्खे चुलत मावस सगळेच…
कधी घरी ….कधी बाहेर
आणि आहेत की मित्रमंडळी…
काही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणारी, फराळाला भेटणारी
अन् काही आपल्यासारखी Wapp वर विश करणारी
आपण ही किती बदललो
वाडा-चाळीतून अपार्टमेंट मध्ये आलो
काल होती सायकल..आता गाडी आली
तेंव्हा होती पुस्तके, आताही ती आहेतच
त्याबरोबर नेट आहे, माहितीचा खजिना आहे
कालपर्यंत होती फटाक्यांची दिवाळी
आता थोडे फटाके थोडी संगीतमय दिवाळी
तेंव्हा बरंच काही करायचो…
आताही बरंच काही करतो
फटाके उडवायचं तसंही वय नाही…
लहानांना ही किती वाजवायचे केंव्हा वाजवायचे याची जाण आली
काळ बदलला… मी बदललो…दिवाळी ही बदलली
करोना, लॉक डाऊन…थोडी भीती, दबलेला उत्साह…संपलं सगळं
आता नवीन उमेद, नवीन उत्साह, नवा जोम
तरीही
आठवणी येणार …येत रहाणार…आणि दिवाळी ही..
मीही आकाशकंदील लावणार.. नवीन कपडे घालणार..
दारात पणती लावणार…फराळावर ताव मारणार.. मित्रांना भेटणार… तुम्हाला शुभेच्छा देणार..
दिवाळी येणार..परत येणार.. येत रहाणार