किती…किती आठवू तूला मी
हृदयातले गाणे..तू एक..एक तू
हळवे मन होई आठवता तुला
गळा दाटतो… श्वास होई गहीरा
दूर असशी तरी…चित्र डोळ्यांत आहे
श्वासांगणिक ओढ तुझीच राहे
कसे सांगू भाव.. माझ्या मनीचे
मंगल भाव झरती..हृदय होई पवित्र
भेटीची आस वाटे..सदा सर्वदा गं
डोळे मिटुनि पाहतो…तुझे सारे भास
हसू सांडते तुझे…दरवळे सुगंध
पोचतो तो गंध…माझ्यासमीप
नयनांत तुझ्या डुंबतो…भिजतो मी
अशी स्निग्धता.. का मिळे कुठेही ?
हातात हात..गुंफुनि बसावे
पाण्यात पाय…डोळे चंद्रा पहावे
आवाज तुझा…शांत करतो मनास
तृप्तता अंगी उमले..मिळे ध्यान सुख
ओवाळतो तुजला…नेत्र निरांजन
सुखाचे अनंत क्षण..तुला सदा मिळोत