हसरा श्रावण,
गातच येईल,
वर्षे चे गायन,
आनंद देईल!
पाऊस बरसे,
डोंगर तळ्यात,
तुडुंब वहाते ,
जीवन डोहात!
पोपटी पानां ची
नक्षी खुलली ,
रंगीत फुलांची,
बाग सजली !
अर्पण करण्या,
आतुर झालेली,
सृष्टीची ओंजळ ,
तृप्त भरलेली !
चराचरामध्ये,
निसर्ग निर्मळ!
आनंदे पहातो,
सृष्टीचा हा खेळ!
वर्षा ऋतू येतो,
सृष्टी ला वेढितो!
सर्व ऋतूनाही ,
संजीवन देतो !