कधीच समजू नका स्वतःला एकाकी…
नसेल कोणी जरी आपल्या सांगाती,
बोलावे मग मनसोक्त स्वतःशी…..
सावित्री ती अपुली माता,
न डगमगता न घाबरता,
आपला प्रवास सुखकर करून गेली,
काट्यांची वाट तुडवून स्वतः,
आपल्यासाठी साक्षरतेचा
अक्षय ठेवा देऊन गेली…..
स्मरण करून तिचे आज,
पिढ्यानपिढ्या स्त्री शिक्षणाचा लेऊ साज…..
![](https://i0.wp.com/aspiringviibes.com/wp-content/uploads/2024/01/Savitri-bai-phule.jpg?fit=366%2C374&ssl=1)