निघून गेलीस तू दूरच्या प्रवासाला!
संस्काराची शिदोरी देऊन ती आम्हाला!
माहित होते की हा प्रवास आहे अटळ ..
पण माहीत नव्हते हीच आहे ती वेळ!
किती वर्षांच्या, दिवसांच्या, क्षणांच्याच साक्षी!
मनी बघता फोटोत दृश्यरुप तेची!
डोळ्यासमोर येते ती तुझीच मूर्ती!
पाणीदार तुझे डोळे येती नजरे पुढती!
दिवस जातील, पुन्हा रुळून जाऊ जीवनाशी!
काव्यरूपी ही श्रद्धांजली तुझ्या चरणाशी!