डोळ्यांत कुतुहल…ओठांवरी तृष्णा
वाढत राहिले..ओढत राहिले
पाहता तुला..पुन्हा पुन्हा
हातांचे चाळे..चालले
उगाचच
मेळ न त्यांचा बैसला
बट गालावरी तुझीया.. ढळतच राहे
पाहता तुला..पुन्हा पुन्हा
गर्दीत हरवले.. तुझे माझे डोळे
शोधण्या..ओळखीचे काही
पापण्यां ओलावल्या नकळत
पाहता तुला..पुन्हा पुन्हा
जाहली वेळ निरोपाची.. आणिक
संपला सोहळा अपुला
ऊतु गेले अकस्मात.. हृदयाचे आसू
पाहता तुला..पुन्हा पुन्हा