माहेराहून घेऊन आलेली संस्कृती, कुलाचार मोठ्या श्रद्धेने ती सासरी जोपासत होती.
देवीच्या सहवासातले नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे तिच्या श्रद्धेची परिसीमा.
आज सवाष्णी पूजनाच्या दिवशीच तिच्या कुंकुवाचं अस्तित्व अचानकपणे धोक्यात आलं.
त्याला बघायला जाण्यासाठी ती निघाली मात्र, दरवाज्यात ठसठशीत कुंकू लावलेली आणि गळ्यात फक्त डोरलं घातलेली एक स्त्री उभी राहिलेली दिसली.
आजही सवाष्णीच्या कुलाचाराचे कर्तव्य पार पाडून ती हॉस्पिटलमध्ये पोचली आणि त्याला बघताच आपलं कपाळावरचं कुंकू अजूनच ठसठशीत दिसतंय हे तिला सहज पणे जाणवलं.