तिचं पोरगं शाळेतून आल्या आल्याच लडिवाळपणे तिच्या कुशीत शिरून विसावलं.
आईचा हात केसांतून फिरत असतानाच तिच्या डोळ्यांत पाणी आणि हृदयात कालवाकालव सुरु झाली.
पोराला भुकेसाठी रोजचं काय खाऊ घालावं ह्या चिंतेच्या खोल डोहात ती आई बुडायला लागली.
शेवटी मनावर दगड ठेऊन खोपटातल्या त्या फडताळातला पोचे आलेला जस्ताचा डबा काढला.
आणि … त्या खोपटात अश्वत्थामा पुनश्च अवतरला …