उणीवांची सतत उजळणी
आठवणींची वजावट
बेरजेचे काहीच क्षण मात्र
अजून आलेले नाहीत…
गंधाची ओळख
स्पर्शाचे धुंदपण
चवीचे कण मात्र
अजून आलेले नाहीत…
कोवळ्या प्रकाशाची तिरीप
अंधारा मिटवणारी
ऊबदार किरण मात्र
अजून आलेले नाहीत…
सावळीच तीची काया
उभार मस्त ठाशीव
ओळखीचे क्षण मात्र
अजून आलेले नाहीत…
होकार मिळावा आणिक
धन्यता मिळे दोघांस
तिचे सूर तसे मात्र
अजून आलेले नाहीत…