तव आठवा’वीण दिन फुकाच जातो
भेटतची जा नित्य मजसी तू
कुणास ठावे लाट कोणती
फेसाळुनि धावेल आणि..परंतु !
क्षणा क्षणाला मज आठवसी तू
तूझेच मोहक चित्र निरंतर
रंग तयातील उडण्याआधी
सामोरी ये…सखी क्षणभर !
कितीक वर्षे भजले मी तुजला
प्रसन्नता मिळाली तव आठविता
गोजिरे रुप तुझे त्यावेळचे
ठसली मनावर ती सात्विकता !
सोबत सदा तूझीच असे
तरी..आयुष्यभर मी वाट पाहिली
सांज आता आयुष्याची..अन्
आस फक्त तूझ्या दर्शनाची !