सुख पाहू जाता पुढे दुःख येते
जणू वेषधारी सूख दुःख हो ते
विषयी न सुख तेनाती न जगती
गुरु सद् गुरू संत हे सांगताती..१
सुख शोध घेता दिसे मार्ग एक
परमात्म प्राप्ती सुख मात्र एक
भगवंत नामातचि ईश प्राप्ती
गुरु सद् गुरु संत हे सांगताती..२
मुखी नाम घ्यावे दिले सद् गुरुंनी
अती भक्तीभावे गुरुंना स्मरोनी
आशा आकांक्षा नको वासना ती
गुरु सद्गुरु संत हे सांगताती..३
नसे देव नामाहुनी वेगळा तो
वसे देव नामातचि सावळा तो
असे नाम घ्या देव येईल हाती
गुरु सद्गुरु संत हे सांगताती..४
जिथे नाम तेथे भगवंत भक्त
भगवंत प्राप्ती जगणे तदर्थ
मुखी नाम भक्ती कलीमाजी मुक्ती
गुरु सद्गुरु संत हे सांगताती..५