हरवले ते दिन…हरवले ते मैत्र सारे
व्यस्त झाले तास अन् सेकंद सारे
भोवतीच्या सगुण फुलांना…येता जाता हाक द्या रे !
वेळ आता मिळत नाही..कारण आहे सर्वांमुखी
शेजारीच राहूनही आता..आम्ही सारे अनोळखी !
घर..अॉफिस..घर..इतुकाच मार्ग आमुचा…
आजूबाजूस वळून पाहण्या..मान आता ना वळे !
कोण,कुठले..अनोळखी तरीही…
भेटती काही लोक असे
जन्मांतरीची ओढ वाटे…मन गुंतूनी फुलायचे !
रोज रोज त्याच गोष्टी…सवयीने पार पाडतो
यंत्र हे सैलावले आता…सुहृदांची सोबत मागतो !