रिक्त झाले मन
जसे मधमाशीचे पोळे!
गेले मधु शोषून जरी,
मन त्यातच घुटमळे !
रिक्त झालेली क्षते,
कोरून बांधलेली घरटी!
मधु साठविला तेथे,
क्षणिक त्या सुखासाठी !
फुल पाखरे प्रेमाची,
उतरली काही क्षणासाठी!
मागे ठेवून ती गेली,
मधु दुसऱ्या कोणासाठी!
पोळी आधार ही घेती,
घराच्या वळचणीला!
अर्थशून्य तो आधार,
उमजे त्या मधमाशीला!
कार्य संपताच तिचे,
सोडून जाई तेच घर!
घराचा सापळा तो,
राही पोरकाच पार!
आता गमते मनाला,
सत्य त्यातील ते थोर!
प्राण पाखरू ही जाता,
उरे नुसतेच कलेवर !