ढगाळलेली हवा,
हातात कप हवा !
वाफाळलेल्या चहाचा,
प्रत्येक घोट नवा !
कविता लिहिता लिहिता,
हातात चहाचा कप होता,
बाहेरच्या खिडकीतून ,
भारद्वाज बोलवत होता!
खिडकीतून बाहेर बघताना,
प्रतीक्षा नव विचारांची,
झटकून जळमटे ही,
कोत्या खुळ्या मनाची !
शुभ दर्शनी तयाच्या,
होतेच मी ही मग्न !
घडेल अवचित काही,
जे पाहिले मीही स्वप्न !