निवृत्ती, ज्ञानाची,
लाडकी बहीण,
जगली क्षणक्षण,
भावांसाठी !
बालपण गेले,
अकाली प्रौढत्व,
ज्ञानाचे तत्व,
सामावले !
ज्ञानदेव रुसला,
बंद ताटी केली,
मायेची मुक्ताई,
साद घाली !
पोरपण होते
मांडे करू वाटले,
ज्ञानाने चेतवले,
अग्नी रूप!
होती आदि माया,
तिन्ही भावंडांची,
शिकवण तिची,
नाम्यासही !
मुक्त झाली मुक्ता,
देह बुद्धी गेली,
अमर राहिली,
विठ्ठल कृपेत !