अगदी काहीच नाही जमले तर, मौन साध्य करून घ्यावे… निश्चय निग्रह मग जुळून येतील, पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सुटून जातील….
मिळतील उत्तरे…
तणावाचं आयुष्य जगताना हलकेफुलके क्षण यावेत…
त्या क्षणांची प्राजक्त फुले होऊन…
मन उमेदीने भरून जावे…
नित्य नव्या समस्यांना सामोरे जाताना,
कोणाचे तरी आश्वासक शब्द, कलकलत्या जीवास शांतवून जावे…
धाव धाव धावणाऱ्या थकल्या गात्रांना,
क्षणभर निवांत बस जरा या
शब्दांचे अत्तर शिंपडावे….
काळ कोणासाठी थांबत नाही, माणसानेच माणसासाठी थोडे थांबावे…
समाधानाचे कुंपण मनास घालून हव्यासाचे
क्षण रिते करावे…