जन्मदात्री माय,
सांभाळे नऊ मास!
बालपणी भरवी ,
घासातला घास !
बापाची माया
न दिसे बाहेरी !
परी ओसंडून वाहे,
मनातून भारी !
माय बाप दोन्ही,
संसार रथाची चाकं!
एक साथ जाती,
तेव्हा मिळे सुख वाट!
माय बापाचे छत्र,
आता नाही डोक्यावरी!
परी छाया त्यांची कधी,
झाली नाही दूरी !
जन्मदाते माय बाप,
प्रेम त्यांचे अखंड!
मनी मी अनुभवते,
माया त्यांची उदंड!