सहजता माझ्या मनीची
सदा अशी जपून रहावी
बदलत्या जगाबरोबर बदलायची
लवचिकता त्यातून जन्मावी
रात्री गुलाबी रंगलेली
सकाळी सफेद होते
निसर्गाशी नाते जपते
ही मधुमालती
हिरव्या दाट पानांत
सफेद गुलाबी हे गुच्छ
वाकून पहातो साऱ्यांना
न मानता कुणा तो तुच्छ
किमया निसर्गाची
न्यारी पहा किती
प्रेमाने सांभाळा नाती
संदेश देते ही मधुमालती
Very nice👌👌👌