धडाडणा-या समुद्र लाटा…धडधडणारे हृदय
ज्याच्या रम्य फेसाळणा-या लाटा…आज धडकी भरवताहेत
का तो आधीपासून तसाच आहे..मीच माझ्या सोयीनुसार अर्थ काढतोय का ?
घोंघावणारं वारं…धूळीनं सारं अस्पष्ट बनवलंय
आधीचं शीतल वारं..आज का दृश्य विचलित बनवतंय
का ते तसंच आहे आधीपासून…नि माझ्या डोळ्यावर चश्मा होता का..कुठल्या तरी विचारधारेचा ?
अतिशय तापमान वाढवणारा सूर्य…अंगाची काहिली करतोय तो
कोवळ्या प्रकाशाचं अप्रूप होतं मला
आज तो सूर्य आग का ओकतोय…
का तोही तसाच आहे आधीपासून….नि मीच माझ्या कोशात सुरक्षित समजत होतो मला ?
विचारांचं काहुर माजलंय मनात…संस्कृती बद्दलची व्याख्याच खटकते आहे आता
एकमेकांवर वरताण करणारी धार्मिक मानसिकता…आधीही होतीच म्हणे
मग माझ्या डोळ्यावर कुठली पट्टी बांधली होती तेंव्हा ?