करता येईल का प्रपोझ
बसणे गुडघ्यावर अन् हातात मस्त रोझ
कधी सुचलं नाही ना कधी केलं
अर्ध आयुष्य असंच सरून गेलं
आता जर आलीच कधी अशी वेळ
तर बघेन म्हणते करून हा ही खेळ
पुढाकार घेऊन बोलतं करायचंय तुला
बघायचंय झालेला तुला नाद-खुळा
इच्छा माझी आहे अशी सक्त
कधीतरी डोळ्यातलं प्रेम शब्दात होऊ दे व्यक्त
एखादाच उद्गार अन् हातात हात
जन्मभर लाभो अशीच तुझी साथ..