नव वर्षा तव सहर्ष स्वागत !
अभिमान ही तो गर्व नको
नवागताचे होते स्वागत
हुरळूनी तू कधी जाऊ नको ll १ll
जुने जाऊनी नवीन यावे
नियमचि आहे निसर्ग हा
दुःख सरोनी सुख दिन यावे
रात्री मागुनी दिवसचि हा ll २ll
जुने ही असते भले चांगले
उत्त्तम जे जे ते घ्यावे
दुःख उगळुनी तेच तेच ते
कशास कोणा हिणवावे ll ३ ll
जर्जर जनता गतवर्षीचा
आठव सुद्धा नको नको
निसर्ग खेळ हा ईश्वरी सत्ता
दोष कुणाही नको नको ll ४ ll
चूक आमुची विसरुनी गेलो
त्यांना गर्वाने फुगलो
निमित्त केवळ गतवर्षा तू
रोग रौरवी सापडलो ll ५ ll
गत वर्षा तू संकटातही
दिलीस शिकवण भली भली
आयोग्य सेवा माणुसकी ही
सर्व सुखांची गुरु किल्ली ll ६ ll
झाले गेले विसरुनी जाऊ
गत वर्षा ! तुज निरोप हा
नव वर्षा तव आगमनाची
उत्सुकता मनी, सूर्य नवा ll ७ ll
ये नव वर्षा ! सुख शांती धन
आरोग्य घेऊनी चैतन्य
गौरवू तुजला सन्मानही करु
जीवन व्हावे तव धन्य ! ll ८ ll
समयोचित अर्थपूर्ण रचना