पावसाचं धुमशान जोरात चाललंय,
परतीचे वेध आकाश मोकळं होऊन आवरायला लागलंय!
विजा तांडव नृत्य करून कडाडून घेतायत,
ढगांचा गडगडाट हत्ती च्या टकरी चा चित्कार काढत गरजतायत
धडकी भरवणारा थयथयाट करून मानवाला नीट राहण्याचा संदेश देतय.
धरतीमातेला दिलेले भरभरून
त्याचं असं अस्ताव्यस्त कोसळणं भूमातेला असह्य
झालंय..
बळीराजाचे रुदन प्रपातात विरघळून गेलय..
तरीही त्या पावसाचे धुमशान जोरात चाललय…
वाटेतील सर्व प्राणिमात्र भिजवत तुडवत नाश करत चाललंय…
कोसळताना सौदामिनी अनेकांचे जीव घशात घालतेय….
राहणारा मागे वेदनेचा दाह सहन करत चाललाय..
जळणारे जीवन पुनश्च पावसाच्या आशेने शांत होत चाललय…..
असं हे निसर्गाचे ऋतुचक्र अविरत चाललंय….