तीन रंगात फडकत राहील,
माझ्या देशाचा सन्मान !
आकाशातून विहरत जगभर जाई,
भारताचा अभिमान !
केशरी, पांढरा,अन् हिरवा रंगध्वजाचे येत क्रमाने.!
वैराग्याला प्रथम स्थान ते.. ..दिलेअसे देशाने!
पावित्र्य जयाचे दावून सर्वा, शुभ्र पांढरा मध्ये असे!
हिरव्या रंगाने ती अपुली, सस्यशामल भूमी दिसे. !
विजयचक्र हे मधोमध दावी
‘विजयी भव’ चे रूप सर्वा!
चक्रा वरच्या आऱ्या दाखवती, देशभक्तांच्या शौर्या!
उंच लहरता तिरंगा अपुला,
स्वातंत्र्याची ग्वाही देतसे!
दरवर्षी नव जोशाने हा,
स्वातंत्र्यनभी फडकतसे!
गर्वाने आम्ही पुजितो,
जो देशाचा मानबिंदू खरा!
त्याच्या छत्राखाली भोगतो, स्वातंत्र्याचा रंग हा न्यारा!
स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन असो!
आमचा तिरंगा,
फडकत राहील!
या तिरंग्याच्या,
रक्षणासाठी!
प्रत्येक बांधव,
सज्ज राहील!
Mast