मनाच्या आभाळातून,
शब्दांचे ढग उतरतात,
वेगवेगळ्या भावना घेऊन,
कधी रिक्त तर कधी भरलेले,
कधी पांढरे तर कधी काळे!
जसं आभाळ फिरेल तसे हे शब्द ओथंबून येतात,
अगदी झेपावून येतात,
झराझरा बरसू लागतात…
कागदावर लेखणीच्या सहाय्याने
बरसू जातात!
तेव्हाच हे मनाचे आभाळ रितं होतं!
ते रितेपण पेलवत नाही काहीवेळा!
उदासीनतेची छाया येते,
विविध आकाराच्या त्या काळ्या
पांढ-या ढगातून!
एखादा ढग हत्त्तीसारखा दिसतो
तर एखादा सशासारखा!
फिरत असतो त्याच्याच तंद्रित!
त्यातूनच निर्माण होते एखादी
शब्दमाला!
वेढून रहाते सार्या मनाला,
व्यक्तातून अव्यक्ताकडे जाणारी,
स्वत:च्याच कोशात गुरफटणारी…
त्या काळ्या पांढऱ्या ढगाभोवती
दिसते चंदेरी रेषा…
प्रत्येक ढगाला आपलं अस्तित्व
दाखवणारी…
आणि पटते…
Every cloud has a silver line!