पहाता झुला
वयाचे भान हरपते
झुला झुलण्याला
वयाचे बंधन नसते
उंच उंच घेता झुला
मन आभाळ होते
करपाशा पसरुनी
नभा तोलू पाहते
उंच जाता झुला
यायचे धरणी माघारा,
भान सदैव जपायचे
मानवाचा जन्म सखा झुला
जन्मा येता झुल्यात ठेवती..
ममतेने देऊनी हिंदोळा,
अंगाई गाती..
असाच राहू दे आयुष्याचा झुला,
होत राहो सदैव खाली वरती…..