इंद्रायणी काठी,
आळंदी नगरी !
ज्ञानाची वैखरी,
वहातसे!…….१
ज्ञानोबा माऊली,
सुखाची सावली!
समाधिस्थ येथे,
निरंतर!…..२
सोन्याचा पिंपळ,
त्याच्या पायी ज्ञाना!
करीतसे ध्याना ,
निरंतर……३
ज्ञानियांचा राजा,
शिष्य निवृत्तीचा !
सागर ज्ञानाचा ,
सर्वांसाठी…..४
मन तृप्त होई,
पाहुनी समाधी!
मनास ही शांती,
मिळतसे……५