गरमागरम चहा द्या मज आणुनी…
पिऊन टाकीन मी आनंदाने…
किती किती प्रकार त्याचे,
कधी आल्याचा, कधी वेलचीचा, तर कधी दालचिनीचा…
दरवळ दरवळ पसरे..
कधी बशीतून, फुर् करोनी,
कधी गरम गरम घोट घेऊनी
आस्वाद त्याचा घेतच रहावा,
कधी कटिंग तर कधी फुल…
कधी खारी सवे,
तर कधी पाव बुडवून…
मनसोक्त चहा पिऊन घ्यावा…
जागोजागी अमृततुल्य चहा
लज्जत आणतो भारी…
चहा पिण्याची तर तऱ्हाच न्यारी….
असती जगात अनेक व्यसने..
चहाचे व्यसन जगात लय भारी…..
पाहुण्याचे आदरातिथ्य,
चहाच देतो पोचपावती….
फुळुक पाणी, पांचट, काळाकुट्ट, कडवट…
किती किती विशेषणे लावती तयाला….
तरी सदैव तयार तुमच्या स्वागताला….
म्हणूनच म्हणते…
गरमागरम चहा द्या मज आणुनी..,
पिऊन टाकीन मी आनंदाने….☕☕☕