ज्योत लाविलीस तू,
मनामनात सर्वांच्या!
शिक्षणाची कास तू,
धरलीस स्त्रियांच्या !
ज्योतिराव, सावित्री,
गाठ बांधली स्वर्गात!
एकरुप होऊनी,
मग्न झाले कार्यात!
दीनदुबळया दलितांना,
आधार त्यांचा मिळाला!
अनाथ,सान बाळांना,
मायेचा झरा लाभला!
अस्पृश्यतेस दूर सारूनी,
दीप समानतेचा लावला!
मुलामुलींना शिक्षणाचा,
ध्यास तुम्ही लावला!
शेणगोळे आणि शिव्याशाप
झेलले तिने धैर्याने !
तिच्या त्यागाची फळे,
आज चाखतात मानाने!
ममता, समता यांचे नाते,
जोडले समाजात त्यांनी!
ऋण त्यांचे विसरू नये,
हीच इच्छा मन्मनी !