त्या लहानशा बागेत फुललेली विविधरंगी फुले, आणि त्यावर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, अगदी लहान मुलापासून ते वृद्धत्व आलेल्या जीवाला मोहित करणारे नेहमीचे दृश्य. किती त्यांचे या फुलांवरून त्या फुलांवर भराभर उडणे, ते नाजूक इवले इवले पंख पसरले की, क्षणभर नक्षी….
अति नेत्रसुखद. अगदी परमेश्वराने निसर्गावर चितारलेली विलक्षण कलाकृती… अल्पकाळाचे आयुष्य भरभरून आनंद देणे घेणे, शिकावे फुलपाखरां कडून. क्षणिक दर्शनाने आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात, आयुष्यभर मनात सुंदर दृश्य ठेवून जातात. असंच वागावे आपण!
जिथे जातो तिथे मधूर आठवणींचा प्रकाशमान कवडसा सदैव परावर्तित होत रहावा.. हेवेदावे, उपदेश, तुलना, हेटाळणी आणि नजरेचे निखारे, सारे सोडून उडते फुलपाखरू व्हावे… फक्त मधू सिंचन आणि आनंद पसरवावा…. असे असावे आयुष्य आपले उडते फुलपाखरू… मोहापासून दूsssर……