निघून गेलीस तू दूरच्या प्रवासाला!
संस्काराची शिदोरी देऊन ती आम्हाला !
माहीत होते की हा प्रवास आहे अटळ..
पण माहीत नव्हते हीच आहे ती वेळ!
कितीक वर्षांच्या, दिवसांच्या क्षणांच्या च साक्षी!
मनी बघता फोटोत द्रुष्यरूप तेची!
डोळ्यासमोर येते ती तुझीच मूर्ती!
पाणीदार तुझे डोळे येती नजरेपुढती!
दिवस जातील, पुन्हा रूळून जाऊ
जीवनाशी !
काव्य रूपी ही श्रध्दांजली तुझ्या
चरणाशी !
![](https://i0.wp.com/aspiringviibes.com/wp-content/uploads/2022/05/Ujwala-Mothers-Day.webp?fit=850%2C563&ssl=1)